नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सुटेल : गडकरी

नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांतील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांना केले. दिल्ली येथे ‘भारतीय पाणी परिषद-2017’मध्ये ते बोलत होते. देशपातळीवर अस्तित्वात असणार्या वीज ग्रीडप्रमाणे नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगत गडकरी यांनी नदीजोड प्रकल्पाचे महत्त्व विशद केले. नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांतील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागांचा प्रश्न सुटण्यास मदत मिळेल, असे मत गडकरी यांनी मांडले. पाण्याची मुबलकता ही देशाची समस्या नाही. मात्र, लोकांना पाण्याचे व्यवस्थापन शिकवण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची नासाडी टाळता येणे शक्य असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment