Thursday, 21 December 2017

सचिनच्या राज्यसभेतील पहिल्या भाषणात गोंधळ

सचिनच्या राज्यसभेतील पहिल्या भाषणात गोंधळ

५ वर्षात पहिल्यांदाच गुरुवारी राज्यसभेत सचिन बोलण्यासाठी उभा राहिला आणि विरोधकांच्या गदारोळामुळे सचिनला बोलताच आले नाही. भारतरत्‍न सचिन तेंडुलकर आज राइट टु प्‍ले वर बोलणार होते. मात्र, विरोधीपक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केल्यानंतर सचिनला बोलता आले नाही. उपराष्‍ट्रपती व्यंकय्‍या नायडू यांनीही विरोधकांना वारंवार शांत राहण्याची सूचना केली. सदनात बोलणारी व्यक्‍ती भारतरत्‍न आहे. त्यांचे भाषण संपूर्ण देश पाहत आहे, याचे तरी भान ठेवा, असे आवाहन केल्यानंतरही गदारोळ थांबला नाही. गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीकास्‍त्र सोडले होते. त्या विरोधात संसदेत विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याच बाबत सचिन बोलण्यास उभा राहिला असताना गदारोळ सुरु झाला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज २२ डिसेंबरच्या ११ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment