आधार-पॅन लिंक करण्यासाठी मुदतवाढ

आधार-पॅन लिंकिंगची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने आधार-पॅन लिंक करण्याची मुदत ३ ते ६ महिन्यांनी वाढवण्याची परवानगी सरकारला दिली असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले होते. या मुदतीमध्ये जर आधार लिंक केले नाही तर मात्र पॅन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. आधार कार्डला आयकर विभागाकडून देण्यात येणाऱ्या पॅन कार्डशी जोडण्यासाठीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१७ पर्यत देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारला आधार कार्ड पॅन कार्डशी जोडणे अनिवार्य आहे. मात्र ३१ डिसेंबरपूर्वी हे अशक्य असल्याने या मुदतीत वाढ करणे आवश्यक होते. नोव्हेंबरमध्ये ३३ कोटी पॅनधारकांपैकी १३.२८ कोटी पॅनधारकांनी आधार लिंक केल्याचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment