Sunday, 17 December 2017

सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरुच

सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरुच

लग्नसराईचा काळ सुरु झाला असून नागरिकांकडून सोनं-चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याच्या मागणीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत कमी झाली आहे. म्हणजेच सोन्याचा दर ३०,००० रुपयांपेक्षाही कमी झाला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक ज्वेलर्सकडून होणारी मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमतीत १५५ रुपयांनी घट झाली आहे आणि सोन्याचा दर २९५१० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरात ४८० रुपयांनी घट झाल्याने ३७,८०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

No comments:

Post a Comment