Monday, 11 December 2017

राज्यातील आरटीओने व्हीआयपी नंबर विक्रीतून कमावले ७७ कोटी

राज्यातील आरटीओने व्हीआयपी नंबर विक्रीतून कमावले ७७ कोटी

दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या व्हीआयपी नंबरसाठी अनेक हौशी लोक लाखो रुपये मोजत असल्याचे समोर आले असून गेल्या ८ महिन्यात राज्यभरात आरटीओला व्हीआयपी नंबरच्या मागणीतून तब्बल ७७ कोटींच उत्पन्न मिळाले आहे. पुणे व्हीआयपी नंबर्सच्या मागणीत राज्यात अग्रेरस असून, ३० हजार ३६६ व्हीआयपी नंबर्सच्या विक्रीतून पुणे आरटीओने जवळपास २३ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. त्यापाठोपाठ नाशिक आरटीओने १९ कोटी, ठाणे आरटीओने १० कोटी, कोल्हापूर आरटीओने ७ कोटींचे उत्पन्न कमावले आहे. तर ६ हजार ६५२ वाहनांच्या व्हीआयपी नंबर्सची विक्री मुंबईतल्या अंधेरी, बोरीवली, वडाळा आणि ताडदेव आरटीओने केली असून, त्यातून जवळपास ६ कोटींची कमाई केली आहे. चारचाकी वाहनासाठी १ हा नंबर सर्वाधिक १२ लाख रुपयांना विकला गेला असल्याची माहिती आरटीओने दिली आहे.


No comments:

Post a Comment