Sunday, 17 December 2017

सर्वोच्च न्यायालयाकडून आधार लिंकसाठी पुन्हा मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाकडून आधार लिंकसाठी पुन्हा मुदतवाढ


शुक्रवारी केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असून ‘आधार’ क्रमांक सरकारशी संबंधित विविध योजनांशी जोडण्यासाठी आता पुढील वर्षी ३१ मार्च ही अखेरची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने केंद्र सरकारच्या या प्रस्तावावर अंतरिम आदेश दिला. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आधार कार्ड सार्वजनिक अथवा खाजगी बँकेतही खाते उघडताना आवश्यक असेल. म्हणजे आधार क्रमांकाशिवाय खाते उघडता येणार आहे. पण आधार क्रमांकासाठी अर्ज दाखल केल्याचा पुरावा संबंधित खातेदाराला त्यासाठी सादर करावा लागणार आहे. ३१ मार्च २०१८ ही आधार क्रमांक जोडण्यासाठी अखेरची तारीख निश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असले तरी आधार कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च नायालयात दाखल करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment