Monday, 11 December 2017

राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष

राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष


काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 16 डिसेंबरला राहुल गांधी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते मुल्लापल्ली राजचंद्रन यांनी याबाबत घोषणा केली.  या पदासाठी अर्ज दाखल करण्याची सोमवार अखेरचा दिवस होता. राहुल यांच्या वतीने आतापर्यंत 89अर्ज दाखल झाले होते. 16 डिसेंबर रोजी राहुल यांना पक्षाध्यक्षपदाचे प्रमाणपत्र सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिले जाईल. गेल्या आठवड्यात राहुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राहुल यांना पक्षाध्यक्षपद देण्याचे गेल्या महिन्यात निश्‍चित करण्यात आले होते. राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने 19 वर्षानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला आहे. 1998 साली काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे सोनिया गांधी यांनी घेतली होती.


No comments:

Post a Comment