अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा
भारतीय लष्कराने आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा बदला घेतला आहे. अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एकाला जिवंत पकण्यात आले आहे. १० जुलै रोजी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला होता. तर, १९ प्रवाशी जखमी झाले होते. हा हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी दिली आहे. सोमवारी रात्री श्रीनगर-जम्मू हायवेवर पोलिस आणि सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत या तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले.
No comments:
Post a Comment