Wednesday, 27 December 2017

कर्नल पुरोहित, साध्वीवरील मोक्का हटवला

कर्नल पुरोहित, साध्वीवरील मोक्का हटवला

२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने सोमवारी ले. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूर, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी आणि सुधाकर द्विवेदी अशा ५ जणांवरील मोक्का हटवला. या सर्वांवर आता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली आरोप ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, कोर्टाने श्यामलाल साहू, शिवनारायण कलसांगरा आणि प्रवीण टाकळकी यांना आरोपमुक्त केले असून अन्य आरोपींची आरोपमुक्त करण्याची विनंती फेटाळून लावली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.


No comments:

Post a Comment