Thursday, 21 December 2017

2जी घोटाळ्यात सर्व आरोपी दोषमुक्त

2जी घोटाळ्यात सर्व आरोपी दोषमुक्त

काँग्रेस नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याप्रकरणी माजी दुरसंचारमंत्री आणि डीएमकेचे नेते ए.राजा व डीएमकेच्या राज्यसभेतील सदस्य कनीमोझी यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. २ जी घोटाळ्यासंदर्भात पटियाळा हाऊस येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. २ जी घोटाळ्यासंदर्भात एकूण ३ खटले न्यायालयात सुरु असून त्यापैकी दोन सीबीआयद्वारे तर एक अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केला आहे. ‘यूपीए २’ (संयुक्त पुरोगामी आघाडी) च्या कार्यकाळात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकिस आला होता. या घोटाळ्यामुळे शासनाचे सुमारे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते, याबाबतचा अहवाल ‘कॅग’ने दिला होता. या घोटाळ्यामुळे तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला होता.


No comments:

Post a Comment