Wednesday, 27 December 2017

जयराम ठाकुर यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

जयराम ठाकुर यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ


गुजरातमध्ये सरकार स्‍थापन केल्‍यानंतर आज हिमाचल प्रदेशमध्येही भाजप जयराम ठाकुर यांच्या नेतृत्‍वाखाली सरकारची स्‍थापना केली आहे. जयराम ठाकुर यांनी सोमवारी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपमधील काही मंत्रीही उपस्थित होते. हिमाचल प्रदेशचे राज्‍यपाल  आचार्य देवव्रत जयराम ठाकुर यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. ९ नोव्हेंबर २०१७ रोजी ६८ जागांसाठी मतदान झाले होते. तर, १८ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने ४४ आणि काँग्रेस २१ जागा जिंकल्‍या आहेत. बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता असून, ४४ जागांवर विजय मिळविल्‍याने भाजपने राज्‍यपालांकडे सरकार स्‍थापनेचा दावा केला आहे. 


No comments:

Post a Comment