नाना पटोलेंचा खासदारकी आणि भाजपाला राम राम

आपल्या खासदारकीचा भाजप खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. पटोलेंनी शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला. अनेक दिवसांपासून मोदी सरकारच्या भूमिकेवर खासदार नाना पटोले नाराज होते. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील पटोले खासदार होते. भाजप सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे निकामी निर्णय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील रुसवा राजीनाम्याचे मूळ कारण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकाच चर्चा उडाली. पाटोळे आता काँग्रेस पक्षात सामील होणार असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment