Sunday, 17 December 2017

शिवजन्माच्या वादामुळे विधानसभेत गदारोळ

शिवजन्माच्या वादामुळे विधानसभेत गदारोळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद मिटला असताना भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी १९ फेब्रुवारी ऐवजी ८ एप्रिल ही जन्मतारीख निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केल्याने विधानसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. शिवाजी महाराजांची राज्यात दोनदा जयंती साजरी होते. महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी, असे हाळवणकर यांनी म्हटले.  महाराजांचा जन्म 8 एप्रिल 1630 चा आहे, याला काही संशोधकांच्या संशोधनाचा आधार असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले. यावर सरकारने संशोधकांची समिती नेमून एकाच दिवशी महाराजांची जयंती साजरी करावी, अशी मागणी त्यांनी केली.  यानंतर विरोधक खवळले. शिवाजी महाराजांच्या जयंतीची तारीख निश्चित झाली असताना आता पुन्हा जन्मतारखेचा वाद का निर्माण करता, असा आक्षेप घेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड वेलमध्ये धावले. त्यांच्या पाठोपाठ अन्य आमदारही धावले.


No comments:

Post a Comment