Thursday, 21 December 2017

राज्यात ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा होणार कमी

राज्यात ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा होणार कमी

शासनाच्या विविध योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून ६५ वयाची मर्यादा घालण्यात आली. पण लवकरच ही वयोमर्यादा कमी होण्याची शक्यता आहे. आता ६५ वरून ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहे. सध्या राज्यात ६५ वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ नागरिक म्हणून राज्य सरकारच्या सवलत घेऊ शकतात. पण या सवलतीचा लाभ त्यापेक्षा कमी वय असलेल्या नागरिकाला घेता येत नाही. त्यानंतर राज्य सरकार आता अशा सर्व नागरिकांसाठी वयोमर्यादा कमी करण्याच्या तयारीत आहे, याबाबतचे आश्वासन बडोले यांनी दिले आहे.


No comments:

Post a Comment