महाराष्ट्राच्या कांचनमालाचे ऐतिहासिक सुवर्ण

मेक्सिको येथे सुरू असलेल्या वर्ल्ड पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळाले. महाराष्ट्रातील नागपूरच्या कांचनमाला पांडे हिने ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू बनली आहे. वर्ल्ड पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत एस-११ श्रेणीत २०० मीटर प्रकारात कांचनमालाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. रिजर्व् बँक ऑफ इंडियामध्ये काम करणाऱ्या कांचनमालाला पदक जिंकण्याची आशा होती मात्र तिला सुवर्णपदक मिळेल असे वाटले नव्हते. या कामिगिरीमुळे मला खूप आनंद झाला आहे तो शब्दात सांगता येणार नाही असे तिने सुवर्णपदक जिंकल्यांनतर सांगितले.
No comments:
Post a Comment