संपूर्ण कर्जमाफीपर्यंत सरकारची कोणतीही देणी देऊ नका – शरद पवार

सरकारचे कोणतेही देणे आम्ही संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत देणार नाही, वीज बिल भरणार नाही, कर्जफेड करणार नाही, हा निश्चय करा, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. सामान्य माणूस व शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली तर जनता सरकार उलथल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या पंतप्रधान मोदींना समस्या ऐकून घेण्यास वेळ नाही. उलट लोकांच्या उद्रेकाचे भावनिक राजकारण ते करत असल्याची टीका पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नागपुरात काढलेल्या हल्लाबोल मोर्चानंतर जाहीर सभेत बोलत होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर अतिशय घाणेरडा आरोप करताना शरम वाटायला हवी होती, अशा शब्दांत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले.
No comments:
Post a Comment