ओखी वादळामुळे गुजरातमधील सभा रद्द

ओखी वादळाचे सावट गुजरात विधानसभा निवडणुकीवर दिसून येत आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे मंगळवारी सर्वच मतदार संघातील जाहिर व चौक सभा रद्द करण्यात आल्या असून, काही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेटी देण्यावर भर दिला आहे. ओखी वादळामुळे सोमवार सायंकाळपासून गुजरातमध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. मंगळवारी पावसाने जोर पकडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. याचा परिणाम प्रचारावर झाला आहे. महाराष्ट्रातही कोकणपट्टीसह, रायगड, पालघर व मुंबईत ओझी वादळामुळे पावसाचा तडाखा पाहायला मिळाला. या परिसरातील शाळा महाविद्यालय बंद होते. सिंधुदुर्ग किनाऱ्यावर राज्यासह इतर राज्यातील मिळून १२०० बोटी आल्या आहेत.
No comments:
Post a Comment