Thursday, 7 December 2017

मुस्लिमांना अमेरिकेत बंदी

मुस्लिमांना अमेरिकेत बंदी


अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सहा मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. या निर्णयास आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा आहे, असे सांगत त्यावर प्रतिबंध घातला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे प्रतिबंध दूर होणार आहेत. जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यावर हा निर्णय घेतला होता. यानुसार यमन, इरान, लिबिया, सिरीया, सोमालिया आणि चाड आदी देशांवर निर्बंध लादले गेले होते.


No comments:

Post a Comment