हेमा मालिनीचे वादग्रस्त वक्तव्य

भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी कमला मिल कंपाऊंडमधील अग्निदुर्घटनेचे खापर मुंबईतील वाढत्या लोकसंख्येवर फोडले आहे. पोलीस कर्तव्यात कसूर ठेवतात असं म्हणता येणार नाही. ते खरंतर उत्तम काम करतायत. पण या शहराची लोकसंख्या प्रचंड वाढलीयं. मुंबई शहर संपते तिथे लगेच दुसरे शहर सुरु होते. मुंबईचा अखंड विस्तार सुरुच आहे असे हेमा मालिनी यांनी पत्रकारांना सांगितले. मोठया शहरांमधील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण असले पाहिजे. प्रत्येक शहरांमध्ये लोकसंख्येवर मर्यादा असली पाहिजे. मर्यादेबाहेर लोकसंख्या वाढत असेल तर त्यांना परवानगी देऊ नये. त्यांना दुस-या शहरात पाठवावे असे हेमा मालिनी म्हणाल्या.
No comments:
Post a Comment