पीएफवरील व्याजदरात घट
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदरात घट केली. चालू वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवर 8.65टक्क्यांऐवजी 8.55 टक्के व्याजदर राहणार आहे. या निर्णयामुळे सुमारे सहा कोटी सरकारी नोकरदारांची निराशा झाली आहे. ईपीएफओ मंडळाची आज बैठक झाली. केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पीएफवरचे व्याजदर घटवून ते 8.55 टक्के करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्याला ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली. पीएफचे व्याजदर कमी करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. ईपीएफओने 2016-17 साठी 8.65 टक्के व्याजदराची घोषणा केली होती. 2015-16 साली 8.8टक्के व्याजदर होता आणि आता ते 2017-18 साठी8.55 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
No comments:
Post a Comment