मी कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही : रामदेव बाबा
राजकारण माझ्यासाठी राष्ट्रधर्म आहे. मात्र, मी कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही, ही माझी भिष्म प्रतिज्ञा आहे. माझा देश सुरक्षित राहो, हीच माझी अपेक्षा आहे. काही साध्य करण्याचे माझे लक्ष्य नाही, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बाबा रामदेव यांच्या जीवनावर आधारित ‘जीत’ नावाची मालिका लवकरच प्रदर्शित होत आहे, याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 85भागांच्या या मालिकेत माझ्या जीवनातील संघर्षमय क्षणांना दाखविले गेले आहे. ही मालिका प्रदर्शित झाल्यावर काही वादही निर्माण होऊ शकतात. कोणाला त्रास होऊ नये, म्हणून या मालिकेतील काही पात्रांची नावे बदलण्यात आली आहेत. रामलीला मैदानावर झालेल्या आंदोलनाचाही या मालिकेत समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment