अर्थसंकल्प २०१८ मध्ये महाराष्ट्राला काय काय मिळाले?

गुरुवारी अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या २०१८च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य साठी या प्रमाणे तरतूद करण्यात आल्या आहेत;
कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या पुढे जाऊन शेतमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी 2 हजार कोटींची तरतूद झाली आहे
2022 पर्यंत सर्वांना घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. खाजगी-सार्वजनिक भागिदारीतून हे साध्य करण्यात येणार आहे
सिंचन प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारची 3500 कोटींची मागणी. त्यावर विचार सुरू
मुंबईतल्या उपनगरी रेल्वे : 90 किमी मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 11 हजार कोटींची तरतूद
मुंबई रेल्वे आणि उपनगरी सेवेसाठी 50 हजार कोटींची तरतूद
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालवण्यासाठी विशेष कौशल्य असलेले कर्मचारी लागणार आहेत. त्यांच्या प्रशिक्षणासाठी बडोद्यात प्रशिक्षण केंद्र
सर्व रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सोय
विमानतळं नवीन शहरांना जोडणार. राज्यात तीन विमानतळांच्या उभारणीचं काम सुरू
No comments:
Post a Comment