सर्वाधिक वर्दळीचा स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाकडून मोडित

मुंबई विमानतळाने सर्वाधिक वर्दळ असलेली धावपट्टी ठरण्याचा स्वतःचाच विक्रम मोडित काढला असून मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर २० जानेवारीला २४ तासांमध्ये ९८० विमानांची ये-जा झाली. यापूर्वी मुंबई विमानतळावर ६ डिसेंबर रोजी २४ तासांमध्ये ९७४ विमानांची ये-जा झाली होती. त्यानंतर दीड महिन्यातच आधीच्या विक्रमाच्या तुलनेत अधिक सहा विमानांची ये-जा करुन मुंबई विमानतळाने नवा विक्रम रचला आहे. मुंबईत जागेची कमतरता आहे. तर इंग्लंडमध्ये जगातील सर्वाधिक गजबजलेलं हिथ्रो (लंडन) एअरपोर्ट, गॅटविक एअरपोर्ट, स्टॅन्स्टेड एअरपोर्ट आणि ल्यूटन एअरपोर्ट ही चार विमानतळे आहेत. हिथ्रोमध्ये एकाच वेळी उपयोगात येणारे अनेक धावपट्ट्या आहेत, मुंबईत मात्र एकच धावपट्टी आहे.
No comments:
Post a Comment