Wednesday, 7 February 2018

तीन दिवसात शेअर बाजारात 9.6लाख कोटीचे नुकसान

तीन दिवसात शेअर बाजारात 9.6लाख कोटीचे नुकसान


अर्थसंकल्प सादर होण्याआधी रोज नवनवीन उच्चांक नोंदवत असलेला शेअर बाजार आता त्याच वेगाने लोळण घेत आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून गंटागळया खाणारा शेअर बाजार अद्याप सावरलेला नाही. आज तर शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली. सकाळी बाजार उघडण्यापूर्वी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी तर निफ्टी300 अंकांनी खाली कोसळला. मागच्या तीन दिवसात शेअर बाजारात जी घसरण झालीय त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 9.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळी 1,274 अंकांची घसरण झाल्यामुळे सेन्सेक्स दीड महिन्यांपूर्वीच्या 33,482 या निचांकी पातळीला पोहोचला, तर निफ्टीचीही 10,276.30 च्या पातळीपर्यंत घसरण झाली. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 30 शेअर्सच्या इंडेक्समध्ये 2,164.11अंकांची घसरण झाली आहे. शेअर बाजारात शेअर्सची जी विक्री सुरु आहे त्यामुळे बीएसई नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारमुल्यामध्ये 9 लाख 60 हजार 938कोटींची घट झाली आहे.


No comments:

Post a Comment