‘सरोगसी’द्वारे मूल झालेल्या महिलांना मिळणार मातृत्व रजेचा लाभ

२६ आठवडे मातृत्व रजेचा लाभ ‘सरोगसी’द्वारे मूल झालेल्या केंद्र सरकारी महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार असून कार्मिक मंत्रालयाने या आशयाचे पत्रकच जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या सर्व विभागांना या निर्णयाबतचे निर्देश पाठवले आहेत. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून सर्व विभागांनी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवावी, असेही या पत्रकात म्हटले आहे. याच परिपत्रकासोबत कार्मिक मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयाने सन २०१५मध्ये सरोगेट मातांबाबत दिलेल्या आदेशाची प्रतही जोडली आहे. काही कारणांनी ज्या महिलांना मुल होत नाही त्या महिला भाडोत्री आईच्या (सरोगेट मदर) माध्यमातून बाळ मिळवून आई होतात. पण अशा महिलांना मुलाला जन्म देत नसल्यामुळे मातृत्व रजा मिळत नव्हती.
No comments:
Post a Comment