Thursday, 8 February 2018

तुकाराम मुंढे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळातुन ११व्या महिन्यात बदली

तुकाराम मुंढे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळातुन ११व्या महिन्यात बदली  


पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे.  नाशिक महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यापुढे कार्यरत असतील. तर नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन पुण्यात पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि संचालकीय व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली होती.  मुंढे यांच्या जागी नयना गुंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment