Friday, 16 February 2018

बिहारमध्ये आरा धर्मशाळेत बाॅम्बस्फोट, एक दहशतवादी जखमी

बिहारमध्ये आरा धर्मशाळेत बाॅम्बस्फोट, एक दहशतवादी जखमी

बिहारमध्ये ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आलेल्या 5 दहशतवाद्यांनी आरा इथली धर्मशाळा गाठली आणि त्यांच्या खोलीत सामान ठेवायला सुरुवात केली. हे सामान ठेवत असतानाच झालेल्या बॉम्बस्फोटात एक दहशतवादी जखमी झाला. त्यानंतर बाकीच्या चार दहशतवाद्यांनी तिथून तत्काळ पळ काढला. या स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दहशतवाद्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्याकडील पिस्तुलही पोलिसांनी जप्त केली आहे.  आरामध्ये मोठा हल्ला करण्यासाठीच हे दहशतवादी आले होते असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, यापूर्वी महाबोधी मंदिरात बॉम्ब आढळले होते.  या घटनेनंतर धर्मशाळा परिसरात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरात जाण्यास लोकांना मनाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment