कार्टून चॅनेलवर जंक फूडच्या जाहिरातींना बंदी

लहान मुलांच्या आवडीच्या कार्टून चॅनेलवर जंक फूडच्या जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे. माहिती सूचना आणि प्रसारण मंत्री राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी लोकसभेत यासंदर्भातील माहिती दिली. या जाहिरातींचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो यामूळेच हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जाहिराती बंद करण्याच्या या निर्णयात ९ कंपन्यांचा समावेश आहे. या संदर्भात अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI)ने ११ सदस्यांची समिती नेमली होती. या समितीच्या अहवालावर अंमलबजावणी सुरु असल्याची माहितीही राठोड यांनी दिली. काही दिवसांपूर्वी सरकारने कंडोमच्या जाहिरातींवर बंदी घातली होती. लहान मुलांवर जंक फूडचा परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची नेमणूक करण्यात आली होती. लहान मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी त्यांचे आरोग्य आणि आयुष्यावर परिणामकारक ठरू शकतात असे या अहवालातून स्पष्ट झाले.
No comments:
Post a Comment