Monday, 19 February 2018

फरार नीरव मोदीची अलिबागमधील कोट्यवधींची मालमत्ता उघड

फरार नीरव मोदीची अलिबागमधील कोट्यवधींची मालमत्ता उघड 

करोडो रूपयांचा घोटाळा करून फरार असलेला हिरे व्‍यापारी नीरव मोदी याच्‍या देशभरातील मालमत्‍तांवर गंडांतर आले असताना अलिबाग तालुक्‍यातही त्‍याची कोटयवधी रूपयांची मालमत्‍ता असल्‍याचं समोर आलं आहे. अलिबाग तालुक्‍यातील किहीम येथे नीरव मोदीची मालमत्‍ता आहे. साधारण ७० गुंठे म्‍हणजे पावणे दोन एकरचे फार्म हाउस आहे. त्‍यामध्‍ये ३ गुठे ७६ पॉइंट जागेवर अलीशान शेतघर हे १९८५ मध्‍ये बांधलेले आहे. मालमत्‍ता ही सामाईक असून त्‍यामध्‍ये नीरव मोदीचा हिस्‍सा ६३ गुंठे ३९ पॉइंट तर सिराज भोलुभाय याचा हिस्‍सा ७ गुंठे ११ पॉइंट आहे. स्‍थानिक बाजारभावाप्रमाणे या एकूण मालमत्‍तेची अंदाजे किंमत पावणेचार कोटी रूपये इतकी आहे.

No comments:

Post a Comment