विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात येत्या 10 ते 13 फेब्रुवारीदरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या पिकांची कापणी करुन शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करावी. सर्व नागरिकांनी वादळ, विजा आणि गारपीटीपासून संरक्षण होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये तसेच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये या दिवशी गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे.
Thursday, 8 February 2018
विदर्भ-मराठवाड्यात वादळवाऱ्यासह गारपीटीची शक्यता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment