Tuesday, 13 February 2018

पॉलिसी खरेदी केल्यानंतर ९० दिवसांच्या आत मृत्यू झाला तरी मिळणार विम्याचे पैसे

पॉलिसी खरेदी केल्यानंतर ९० दिवसांच्या आत मृत्यू झाला तरी मिळणार विम्याचे पैसे

एखाद्या पॉलिसीधारकाने पॉलिसी खरेदी केल्यानंतर त्याचे ९० दिवसांच्या आत आकस्मिक निधन झाले तरी विमा कंपनी निश्चित केलेली रक्कम देण्यास नकार देऊ शकत नाही. एका प्रकरणात विमा कंपनीला मृत पॉलिसीधारकाच्या परिवारला ९ टक्के व्याजाबरोबर २.५ लाख रूपयांची रक्कम देण्याचा आदेश राष्ट्रीय ग्राहक पुनर्वसन आयोगाने (एनसीडीआरसी) दिला आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू याप्रकरणात पॉलिसी खरेदी केल्यानंतर ९० व्या दिवशीच झाला होता. त्यानंतर विमा कंपनीकडे त्यांच्या कुटुंबीयांनी दावा दाखल केला होता. पण त्यांना प्रिमियमची रक्कम देऊन कंपनीने त्यांची बोळवण केली होती. २७ जून २०१२ रोजी विमा नियामक आयआरडीएचा हवाला देत न्या. एस श्रीशा यांनी विमा कंपनीला संपूर्ण रक्कम देण्यास सांगितले. आयआरडीएचा हा आदेश पण याच विमा कंपनीसाठी होता.

No comments:

Post a Comment