पाकिस्तानच्या गोळीबारात ४ जवान शहीद

पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात गेल्या पंधरा दिवसांत चारवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यातच ताज्या घटनेत पूंछ येथे रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून यात एक स्थानिक मुलगीही गंभीर जखमी झाली आहे. पाकिस्तानी सैन्याने सातत्याने छोट्या रायफल्सद्वारे गोळीबार तसेच उखळी तोफांचा माराही केला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास पाकिस्तानकडून राजौरीतील मांजाकोटे सेक्टरमध्ये पुन्हा गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये चार जवान शहीद झाले. या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात 12पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करण्यात आला.
No comments:
Post a Comment