Monday, 19 February 2018

प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना परीक्षेचे धडे

प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना परीक्षेचे धडे


'परीक्षा म्हणजे एक उत्सव आहे. फेब्रुवारी, मार्च हा मोसम म्हणजे तणावाचा नाही, तर फेस्टिवलचा आहे.' 'परीक्षा पे चर्चा' या खास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, ' आज तुम्हाला एक नवा मित्र मिळाला आहे.' 'मी शाळेत असताना इतरांना विनोद सांगायचो. परंतु, त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढत आहे, ही गोष्ट तेव्हा मला समजली होती. आत्मविश्वास ही जीवनात खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते. मात्र, आत्मविश्वास म्हणजे बाजारात मिळणारे औषध नव्हे जे एखादी आई परीक्षेच्या दिवशी आपल्या मुलाला देईल. आत्मविश्वास नसेल तर तुमची मेहनत वाया जाते, तुम्हाला परीक्षेत उत्तर येत असेल पण आत्मविश्वासाअभावी आठवणार नाही, त्यामुळे जीवनात आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्मविश्वास कमावण्यासाठी इतरांशी नव्हे तर स्वत:शीच स्पर्धा करा आणि मेहनत करा, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment