Tuesday, 13 February 2018

पाच वर्षांची शिक्षा झालेल्यांना निवडणूक बंदी करा : आयोग

पाच वर्षांची शिक्षा झालेल्यांना निवडणूक बंदी करा : आयोग
किमान पाच वर्षांची शिक्षा झालेल्यांना निवडणूक लढवण्यास बंदी करणारा कायदा करावा, अशी मागणी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. गुन्हेगार व्यक्‍तींनी निवडणूक लढवू नये म्हणून आम्ही अनेक पावले उचलली असली तरी ती पुरेशी नाहीत. या नियमाची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल, असे आयोगाने न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठासमोर सोमवारी सुनावणी होणार आहे. याशिवाय राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकारही आयोगाला मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीसंदर्भातला विषय आयोगाने 1998 पासून उचलून धरला असून यासंदर्भात केंद्र सरकारला शिफारशीदेखील दिल्या आहेत. पाच वर्षांची शिक्षा झालेल्यांना बंदी घालण्याबरोबचर ज्याच्यावर खटला सुरू आहे, त्यांना निवडणुकांना उभे राहण्यापासून रोखण्यासाठी कायदा करावा, अशी शिफारस केली असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment