भारतात जन्मानंतर केवळ 28दिवसांमध्ये दगावतात 6 लाख मुले - युनिसेफ
दरवर्षी भारतामध्ये जन्म झाल्यावर सुरुवातीच्या 28दिवसांमध्येच दगावणाऱ्या बाळांची संख्या 6 लाख इतकी असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. बालमृत्यूबाबत युनिसेफने मंगळवारी अहवाल जाहीर केला. असे असले तरी गेल्या पाच वर्षांमध्ये भारतात बालमृत्यूंमध्ये घट झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगातील एकूण 184 देशांची आकडेवारी या अहवालातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारताचा या यादीमध्ये 31 वा क्रमांक आहे. भारतात अर्भक मृत्यूचे प्रमाण 25.4 (प्रति 1000 जन्म) असल्याचे त्यात म्हटले आहे. बाळाच्या जगण्याच्या दृष्टीने त्याच्या जन्मानंतरचे पहिले 28 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. पहिल्या महिन्याभरात बाळाचा मृत्यू होण्याची सर्वाधिक शक्यता असते. जगभराच्या सरासरीनुसार जन्मलेल्या प्रत्येक1000 बाळांमागे 19 बालके दगावतात.
No comments:
Post a Comment