७ बँकांना गंडवणाऱ्या विक्रम कोठारीला अटक

7 बँकांना गंडा घालणारा रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल यांना सीबीआयनं अटक केलीय. कोठारी पिता-पुत्रावर जवळपास 3 हजार 700 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. बँकांची कोट्यवधी रुपयांची कर्ज ठकवल्याप्रकरणी सीबीआयने विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल या दोघांची चौकशी सुरू केली होती. मात्र तपासात योग्य ते सहकार्य मिळत नसल्यामुळे सीबीआयनं त्या दोघांना अटक केलीय. विक्रम कोठारीने सर्वात जास्त युनियन बँक आॅफ इंडियाकडून 485 कोटींचं कर्ज घेतलंय. तसंच इलाहाबाद बँककडून 352 कोटींचं कर्ज घेतलंय होतं. पण एक वर्ष उलटूनही त्याने बँकेचं कर्ज आणि व्याजही चुकवलं नाही.
No comments:
Post a Comment