तीन आठवड्यात दुसऱ्यांदा अमेरिकेवर शट डाऊनची नामुष्की 
शुक्रवारी पुन्हा एकदा शट डाऊनचे संकट अमेरिकन सरकारवर ओढावले असून त्यांच्यावर गेल्या तीन आठवड्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारी नामुष्की आली आहे. मध्यरात्रीनंतर शटडाउन सुरु झाले. काँग्रेस निधीचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यात अपयशी ठरल्यामुळे अल्पकालीन विधेयके मंजूर करता आली नाहीत. प्रशासनाला शट डाऊन होईल अशी शक्यता वाटत होती. त्यादृष्टीने प्रशासन तयारी करत होते, अशी माहिती व्हाईट हाऊसचे विधीविषयक व्यवहार संचालक मार्क शॉर्ट यांनी दिली. अमेरिकन सिनेटने मागील महिन्यातसुद्धा ट्रम्प सरकारचा निकडीच्या खर्चाचा प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर शटडाऊनचे संकट ओढावले होते. या आर्थिक संकटामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपला प्रस्तावित फ्लोरिडा दौरा रद्द करावा लागला.
No comments:
Post a Comment