Tuesday, 6 February 2018

बीसीसीआयची वेबसाईट नूतनीकरण न केल्यामुळे बंद

बीसीसीआयची वेबसाईट नूतनीकरण न केल्यामुळे बंद 

बीसीसीआयला जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. पण याच बीसीसीआयची वेबसाईट बंद झाल्याची नामुष्की ओढावली. बीसीसीआयची वेबसाईट वेबसाईटचे नुतनीकरण न केल्यामुळे बंद झाली होती. २ फेब्रुवारी २००६ ते २ फेब्रुवारी २०१९ पर्यंत बीसीसीआयने वेबसाईटसाठी खरेदी केलेल्या डोमेनची वैधता आहे. ३ फेब्रुवारी २०१८ वेबसाईटचे नुतनीकरण करण्याची शेवटची तारीख होती. पण हे नुतनीकरण बीसीसीआयने न केल्यामुळे वेबसाईट बंद पडली होती. ही वेबसाईट अखेर सुरु करण्यात आली. ही वेबसाईट सेंच्युरिअनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना सुरु असताना बंद होती.


No comments:

Post a Comment