Wednesday, 28 February 2018

श्रीदेवींच्या मृत्यूची केस बंद; बोनी कपूरना क्लिन चीट

श्रीदेवींच्या मृत्यूची केस बंद; बोनी कपूरना क्लिन चीट


गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेली प्रतिक्षा आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. सुपरस्टार श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी दुबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. या बाबतचे पत्र दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी आणि कपूर कुटुंबीयांबा देण्यात आले आहे. दुबई पोलिसांनी ही केस बंद केली आहे आणि बोनी कपूर यांना देखील दुबई पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे श्रीदेवींच्या मृत्यूबाबत निर्माण झालेली साशंकता संपुष्टात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात कधी येणार या बाबत चर्चा सुरु होती. श्रीदेवींचे पार्थिव मंगळवारी रात्रीपर्यंत मुंबईत आले. त्यांच्या वर आज विलेपार्ले येथे दुपारी अंत्यसंस्कार होतील असा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment