महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकुर

पुण्यातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत विखे-पाटील यांनी शिक्षण विभागावर टीका केली. राज्य सरकारकडून अवांतर वाचन या उपक्रमांतर्गत पुस्तके खरेदी केली जातात. त्यामध्ये सत्यकथा व ऐतिहासिक पुस्तकांचा प्रामुख्याने समावेश असतो. सरकारने या पुस्तकांमध्ये धार्मिक आणि पौराणिक पुस्तकांचाही समावेश केला आहे. यातील पुस्तकांमध्ये कौमार्यभंग, विषयलोलुपता, इंद्रियसुख आदी आक्षेपार्ह उल्लेख आहेत. सरकार राज्यातील लहान मुलांवर हे संस्कार करणार आहे का, सरकारने या पुस्तकांंचे वितरण तातडीने थांबवावे, अशी मागणी विखे-पाटील यांनी यावेळी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित प्रकाशन भारतीय विचार साधना यांचे जे पुस्तक 20रुपयाला उपलब्ध आहे, तेच पुस्तक सरकारने चक्क 50रुपयांत खरेदी केले असून, या प्रकाशनाकडून तब्बल 8कोटी 17 लाख रुपयांची खरेदी करण्यात आली, असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment