Thursday, 22 February 2018

कॅलेंडरमुळे प्रियांका चोप्रा अडचणीत

कॅलेंडरमुळे प्रियांका चोप्रा अडचणीत 

पंतप्रधान मोदी यांच्‍या भेटीदरम्‍यान शॉर्ट ड्रेसमध्‍ये दिसलेली देसी गर्ल प्रियांका चोप्रा कपड्‍यांवरून ट्रोल झाली होती. आता पुन्‍हा प्रियांकाच्‍या कपड्‍यांवरून वाद निर्माण झाला आहे. नुकतेच आसाम टुरिझम डेवलपमेंट कॉर्पोरेशनने एक कॅलेंडर प्रकाशित केले आहे. या कॅलेंडरमध्‍ये प्रियांका चोप्रा हिचा फोटो आहे. पण, या कॅलेंटडरवरील प्रियांकाच्‍या फोटोला काँग्रेसच्‍या एका नेत्‍याने विरोध केला आहे. त्‍यांनी प्रियांकाचा फोटो आसामच्‍या संस्‍कृतीला अनुसरून नसून चुकीच्‍या पद्‍धतीने ते दाखवण्‍यात आल्‍याचे म्‍हटले आहे. या फोटोत प्रियांकाने फ्रॉक घातला असून आसामची पारंपरिक टोपी घातलेली दिसत आहे. प्रियांका आसाम राज्‍याची टुरिझम ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, विधानसभा सत्राच्‍या दरम्‍यान काँग्रेसच्‍या सदस्‍या रूपज्योती कुर्मी (आमदार, मरिअनी), रोजलीन टिर्की (आमदार, सारुपथर) आणि नंदिता दास (आमदार, बोको) यांनी प्रियांकावर आसामची संस्‍कृती चुकीच्‍या पध्‍दतीने दाखवल्‍याचा आरोप केला आहे.

No comments:

Post a Comment