
पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नुयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये इंडिपेंडन्ट डायरेक्टर (स्वतंत्र संचालक) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्या संचालकपदावर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आहेत. जून २०१७ रोजी आयसीसीत स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पदावर इंद्रा नुयी यांची आयसीसीने निवड केली आहे. त्या जून २०१८ मध्ये पदभार स्वीकारतील. त्या या पदावर दोन वर्षांसाठी असतील. पण त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची दाट शक्यता आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या इंद्रा नुयी पहिल्या महिला तसेच पहिल्या स्वतंत्र संचालक आहेत. ‘फॉर्च्यून’ मासिकाने इंद्रा नुयी यांचा जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला आहे. इंद्रा नुयी या पेप्सिकोच्या सीईओ असून त्यांच्या अंतर्गत पेप्सिकोची २२ उत्पादने येतात. यात ट्रॉपिकाना, फ्रिटो- ले, पेप्सि- कोला याचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment