Wednesday, 7 February 2018

अर्थसंकल्पामुळे महाग झाला आयफोन

अर्थसंकल्पामुळे महाग झाला आयफोन


२०१८-१९च्या अर्थसंकल्पात स्मार्टफोनवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतला असून आयफोनच्या किमतींमध्ये त्यांच्या या घोषणेने बराच फरक पडला आहे. अॅपलने अर्थसंकल्पानंतर चार दिवसांनी आपल्या आयफोनच्या किमतीत ३ ते ६ टक्क्यांनी वाढ केली आहे. पण भारतात तयार होणाऱ्या आयफोन SEच्या किंमतीत काहीही फरक पडलेला नाही. आयफोन येत्या काळात आणखी महाग होण्याची शक्यता आहे. कारण की, एप्रिल महिन्यापासून नवी कस्टम ड्युटी लागू होईल. त्यामुळे आयफोनच्या किमतीत वाढ होईल.


No comments:

Post a Comment