Friday, 9 February 2018

डिजीटल व्यवहारात १०० कोटींहून अधिक वाढ

डिजीटल व्यवहारात १०० कोटींहून अधिक वाढ

डिजीटल व्यवहारात दिवसें-दिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात (जानेवारी) शंभर कोटींहून अधिक रूपयांचे व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात डिसेंबरच्या तुलनेत ४.७३ टक्क्यांची डिजीटल व्यवहारात वाढ झाली आहे.  यामध्ये क्रेडीट, डेबीट कार्ड, युनिफायड पेमेंट इंटरफेस(युपीआय), अनस्ट्रक्चरल सपलिमेंटरी सर्विस डाटा (युएसएसडी), प्रिपेड पेमेंट इन्स्ट्युमेंट (पीपीआय) आणि इंटरनेट बँकींग याद्वारे झालेल्या व्यवहारांचा समावेश आहे. यातून जानेवारी महिन्यात १,३१.९५ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षातील ही दुसरी मोठी वाढ आहे. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये सर्वाधिक १४९.५९ लाख कोटी रूपयांचे व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. जानेवारी महिन्यात ९५ लाख ७० हजार व्यवहार (Transaction) एकट्या भीम ॲपवरून झाले आहेत. त्यातून ३६ कोटी ५० हजार रूपयांचे व्यवहार झाले.

No comments:

Post a Comment