Thursday, 22 February 2018

नेस वाडियाविरोधात ४ वर्षांनंतर चार्जशीट दाखल

नेस वाडियाविरोधात ४ वर्षांनंतर चार्जशीट दाखल


अभिनेत्री प्रीती झिंटाच्‍या एक्‍स बॉयफ्रेंड नेस वाडिया विरोधात चार वर्षांनंतर चार्जशीट दाखल करण्‍यात आली आहे. प्रीतीला धमकी आणि छेडछाडप्रकरणी  मुंबई पोलिसांनी मंगळवारी कोर्टात चार्जशीट दाखल केले आहे. जून २०१४ मध्‍ये प्रीतीने दक्षिण मुंबईच्‍या मरीन ड्राईव पोलिस स्‍टेशनमध्‍ये नेस वाडियाविरोधात तक्रार दाखल केली होती. ३० मे २०१४ ला मुंबईच्‍या वानखडे स्‍टेडियममध्‍ये पंजाब आणि चेन्‍नईचा सामना सुरू होता. तेव्‍हा प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्‍यामध्‍ये भांडण झाले होते. यानंतर प्रीतीने पोलिसांत तक्रार करत केली. तिने तक्रारीत म्‍हटले होते, 'नेस वाडिया तिकिट डिस्‍ट्रिब्‍युशनच्‍या स्‍टाफवर भडकले. त्‍याचवेळी मी तेथे बसले होते. मी नेसला म्‍हटले आमची टीम जिंकत आहे, तू शांत बस असे सांगितले. पण, नेसने शिव्‍या द्‍यायला सुरूवात केली आणि जबरदस्‍तीने माझा हात ओढला. यामुळे माझ्‍या हाताला दुखापत झाली.' प्रीतीने याचे काही फोटोही पोलिसांना दिले होते. प्रीतीने नेस वाडियाविरोधात पोलिसांना ईमेल द्‍वारे तक्रार केली होती. यानंतर कोर्टाने २० हजारांच्‍या जातमुचलक्यावर नेस वाडियाला जामिनावर सोडून दिले होते.

No comments:

Post a Comment