Tuesday, 13 February 2018

महिला वैमानिकामुळे वाचले २६१ प्रवाशांचे प्राण

महिला वैमानिकामुळे वाचले २६१ प्रवाशांचे प्राण
एअर इंडिया आणि विस्तारा एअर लाईन्सच्या विमानांचा गेल्या आठवड्यात हवेत अपघात होता-होता वाचला. एअर इंडियाने या अपघातापासून एअर इंडियाच्या प्रवाशांनी भरलेल्या विमानाला वाचवणाऱ्या वैमानिक अनुपमा कोहली यांना सलाम केला आहे. विस्तारा एअर लाईन्सचे विमान १५२ पॅसेंजर घेऊन  दिल्लीवरुन पुण्याला निघाले होते आणि एअर इंडियाचे विमान १०९ पॅसेंजर घेऊन भोपाळला निघालेले विमान यांच्यामध्ये ७ फेब्रुवारीला होणारा अपघात वैमानिक अनुपमा कोहली यांच्या सतर्कतेमुळे टळला. ही दोन विमाने यावेळी एकमेकांपासून फक्त १०० मिटर अंतरावर होती. विस्तारा एअर लाईन्सचे विमान जवळ आल्याचे लक्षात येताच कोहली यांनी तत्परता दाखवत सुरक्षित एअर इंडियाचे विमान दूर नेले. त्यांच्या याच तत्परतेमुळे एअर इंडियाने अनुपमा कोहली यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment