मुंबई क्रिकेट असोसिएशनने ने थकवले पोलिसांचे १३ कोटी
मुंबई पोलिस दलातील हजारों पोलिस क्रिकेट वर्ल्ड कपच्या बंदोबस्तासाठी जुंपले जातात मात्र, त्या बंदोबस्ताचे शुल्क अदा करण्यात मुंबई क्रिकेट असोसिएशन चालढकल करत आहे. मागील 17 क्रिकेट स्पर्धेंकरिता पुरविण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्ताचे रू13.42 कोटी आजपर्यंत अदा केले नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे. एनसीपी नेते शरद पवार आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्या पॅनलची निर्विवाद सत्ता मुंबई क्रिकेट एसोसिएशनमध्ये असल्यामुळेच मुंबई पोलिस सावधगिरी बाळगत आहे. असे बोलले जात आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे गेल्या 10 वर्षात संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी दिला गेलेला पोलिस बंदोबस्त आणि शुल्काची माहिती मागितली होती.
No comments:
Post a Comment