देशात १५०० हून अधिक 'आयएएस' पदे रिक्त
बसावन समितीच्या शिफारशीनुसार २०१० ते २०१९ दरम्यान प्रत्येक वर्षी १८० आयएएस पदांची भर्ती करावी अशी तरतूद आहे. या पाठीमागील उद्देश होता की, वर्ष २०२० पर्यंत आयएएस अधिकार्यांच्या रिक्त जागांची संख्या ५०० हून कमी राखली जाईल. मात्र, अधिकर्यांच्याकडून VRS घेणे, नोकरी सोडणे अथवा त्यांना कामावरून कमी करणे अशा कारणांवरून हे टारगेट पूर्ण होऊ शकले नाही. सुत्रांच्या म्हणण्यानुसार २०१९ पर्यंत पात्र ठरणार्या आयएएस अधिकार्यांची संख्या आणखीन कमी होत जाईल. सध्या १५०० हून अधिक आयएएस पदे रिक्त आहेत. नोकरी सोडणे अथवाVRS घेण्याचे नियम कडक करावेत का याबाबत चर्चा सुरू आहे. याकारणामुळे गेल्या ७ वर्षात वेळेच्या पूर्वी ३०० अधिकार्यांनी नोकरीला राम-राम ठोकला आहे.
No comments:
Post a Comment