Saturday, 24 February 2018

भ्रष्टाचाराबाबत भारत 81व्या स्थानी

भ्रष्टाचाराबाबत भारत 81व्या स्थानी 

सरकारी कामे करण्यासाठी लाच घेण्याबाबत आणि पत्रकारांच्या सुरक्षितेतेबाबत भारत आशिया खंडातील सर्वात खराब देश असल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. भ्रष्टाचाराच्या बाबत भारताची प्रतिमा अद्याप खराबच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 2017च्या यादीत भारताचा क्रमांक 81वा आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराबाबत या अहवालात 180 देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2016मध्ये भारताचा 79वा क्रमांक होता. भ्रष्टाचाराविरोधात सर्व देशांना कडक संदेश देण्याच्या उद्देशाने 1995 मध्ये हा निर्देशांक सुरु करण्यात आला होता. एखाद्या देशात किती भ्रष्टाचार होतो हे विश्लेषण, व्यापारी, तज्ञ आणि अनुभवाच्या आधारावर निश्चित केले जाते. 

No comments:

Post a Comment