Thursday, 15 February 2018

एका रात्रीत स्टार झालेल्या प्रिया प्रकाशवर तक्रार दाखल

एका रात्रीत स्टार झालेल्या प्रिया प्रकाशवर तक्रार दाखल 



अवघ्या काही तासात इंटरनेट सेन्सेशन प्रिया वारियर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली असली तरी ती हैदराबादमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रियासह चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये प्रिया वारियरविरोधात फलकनुमा पोलिसात मुस्लिम समाजातील काही तरुणांनी तक्रार दाखल केली आहे. या तरुणांनी ‘उरू अदार लव्ह’ चित्रपटात प्रिया झळकलेल्या ‘मणिक्या मलराया पूर्वी’ गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. पण प्रियाविरोधात तक्रारीत कोणतेही आरोप नाहीत. इंग्रजीत ‘मणिक्या मलराया पूर्वी’ या गाण्याचे भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे. पण अद्याप पोलिसांनी एफआयआर दाखल केलेलि नाही.

No comments:

Post a Comment